पवार कुटुंबातील अंतर्गत वादानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे नक्की काय भूमिका घेणार, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संघर्षाबाबत आपले मत मांडले आहे.
‘पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब असून सर्वकाही व्यवस्थित होणारच आहे. पवार कुटुंबियांशी माझे दोन पिढीचे कौटुंबिक संबंध आहेत. पार्थ पवार माझे चांगले मित्र आहेत ते काहीच चुकीचं पाऊल उचलणार नाहीत,’ असा विश्वास राजेश टोपेल यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर अजित पवार, पार्थ पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जयंत पाटील यांनी पार्थ किंवा अजित पवार हे नाराज नाहीत असं स्पष्ट केलं आहे. तसंच आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार आहे याकडं पवारांचे निकटवर्तीय लक्ष वेधत आहेत