आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी अजित पवारांचे कौतुक केले आहे. अजित दादांची कामाची एक स्टाईल आहे. ते तडाफडकी निर्णय घेतात असे कौतुक रोहित पवार यांनी ट्विटरवरून केले आहे.
शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा झाली. रोहित पवार हे त्यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पवार साहेबांच्या प्रतिक्रियेवर मी काहीही बोलणार नाही असे रोहित पवारांनी म्हटले होते.
मतदारसंघातल्या काही कामानिमित्त रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ते म्हणाले, काही मतदारसंघातल्या कामानिमित्त दादांना भेटलो. हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1295714242159616005?s=20