महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांना मी आठवण करुन देते की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे,’ असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. ‘माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये,’ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे.(1/2)@CMOMaharashtra @MHVaghadi @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 20, 2020
सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या कोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, ‘या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, तसेच त्यामध्ये कुठलाही दोष आढळून आला नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे