मुंबई : बंगालची निवडणूक संपल्यानंतर राजकीय टीका, आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. याचं वारं महाराष्ट्रातून देखील वाहत असून, या विषयावर सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधत, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे.
“चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटटरवर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून, पाटील यांच्यावर केली आहे.
चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ,आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला……सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD1/2 pic.twitter.com/oEbMSK41TC
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021
तसेच, पाटील यांनामहामारीच्या संकटाशी देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशाच विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा एम.फिल करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या पक्षात पाहिले, तर तिथेही अनेक नेते हे जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असा सल्ला स्पष्ट शब्दांत रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
यावेळी, जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशारा देखील रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
आली नाही अशा आमदार महोदयांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये.आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत,थोडं मागे वळून पाहिलं तर आपला इतिहास आपल्या लक्षात येईल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021