पुणे (वडगाव शेरी) : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे.शरद पवारांच्या व खासदार सुप्रिया सुळे, खा.वंदना चव्हान, आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला मतदार संघात NCP COVID Help Desk सहायता कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड ब्रिगेड मदत कक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या संपर्क कार्यालयात रविंद्रआण्णा माळवदकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांना COVID संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी NCP COVID ब्रिगेडच्या वतीने सहायता कक्ष चालू करण्यात आला आहे.
या अंतर्गत कार्य करण्यासाठी विधानसभा निहाय राष्ट्रवादी ब्रिगेड तातडीने तयार करण्यात येणार आली असून त्याच्या मार्फत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंहगड रोडला वडगाव ब्रिज चौक येथे नागरिकांसाठी एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पडेस्क सुरू करण्यात आले आहे. या मार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची सोय करून देण्यात अली आहे.
या वेळी मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे, नगरसेवक महेंद्र पठारे , नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका सुमनताई पठारे, संतोष राजगुरु, डाॅक्टर गायकवाड तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.