परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपोषणाला बसलेल्या खासदारांना पांठिबा दर्शवत शरद पवार यांनी देखील आपण एक दिवस अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या एका महिला खासदारांनी देखील अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील अन्नत्याग करत या आंदोलनात सहभागी होत असल्याची माहिती दिली आहे.आमचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय ते एक दिवस अन्नत्याग करत कृषी विधेयकाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या सदस्यांच्या आंदोलनात देखील सहभागी होत आहेत. मी देखील सभात्याग करून बाहेर पडले असून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे खान यांनी यावेळी सांगितले.
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदारांनी अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार यांनी खासदारांना आपले समर्थन दिले आहे.
Read Also
मराठा क्रांती मोर्चा आता अजित पवार यांच्या घराच्या दिशेने…https://t.co/sQk4VHnNbi#AjitPawar #MarathaReservation #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020