मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. मात्र अशातच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतरलआता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार यांनी प्रथमच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.
प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब (भाई) शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय.त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये.@MahebubShaikh20
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 31, 2020