No Result
View All Result
सातारा: साताऱ्यात सध्या राजकीय वातावरण पेट धरू लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात एका पक्षात असूनही पुन्हा एकदा संघर्ष बघायला मिळत आहे. या दोन्ही राज्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मोट बांधली आहे.
जिल्हा बाइकच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेण्याबाबत अद्यापतरी निर्णय झालेला नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांना आता सातारा जिल्हा, कराड, पाटण तालुक्यातील मतदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने टाकलेला चक्रव्ह्यू भेदण्यात उदयनराजे यशस्वी होणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बैठक बोलविण्यात आलेली आहे. या बैठकीत घ्यायचे, नेत्यांच्या मागणीनुसार जागा वाटपाचा तिढा सोडविणे आणि खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनलमध्ये सामावून घेणे अथवा त्यांच्या विरोधात उमेदवार अंतिम करणे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यास अद्याप तीन दिवस बाकी आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच कोना कोणाला अर्ज मागे घ्यायला सांगायचे आहे हेही अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे लागले आहे.
उदयनराजेंना सामावून घेण्याबाबतचा चेंडू त्याचे बंधू आणि कट्टर विरोधक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मज्जा बघत आहे. खासदार उदयनराजे भोसले ज्याभागातून निवडणूक लढवणार आहेत त्याभागात सर्वाधिक मते सातारा, कऱ्हाड, व पाटण तालुक्यात आहेत.
याभागात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे चांगलेच वर्चस्व आहे आणि सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रभाव आहे. दुसऱ्या बाजूने ५५ मते उद्यनराजेंकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वानी मदत केली तरच उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार आहे असे बोलले जात आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील काळ बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटून आले आहेत. या भेटीत त्यांना काही कानमंत्रही या निवडणुकीसाठी मिळालेला असणार आहे. त्यामुळे आता कोणाचे सीट बाधित राहते आणि जाते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
No Result
View All Result