ट्रान्सजेंडरसह समाजातील इतर घटकांचा समावेश असणाऱ्या LGBT समुदायाला आपल्या हक्कांसाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. समाजात त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही. त्यामुळेच समानतेसाठी हा समुदाय आता एकत्र येत लढा देत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात LGBT सेलची स्थापना केल्याने आगामी काळात इतर राजकीय पक्षही या समुदयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
आपल्या समाजातील एलजीबीटी लोक मुख्य प्रवाहात यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे याचा विचार करुन राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला. शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे’, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे 14 जण एलजीबीटी समुदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
Read Also :
सरकारने मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये , अन्यथा .. https://t.co/7rZdpVP0SR #MarathaReservation
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020