इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे.हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा माई पाटील यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या भेटीला पार्थ पवार आले होते तेव्हा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांची पण भेट घेतली. Ajit Pawar Son Parth Pawar meets BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil
पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना ऊत आला आहे.सोमवारी सायंकाळी पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील,मयूरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.काही काळापूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम केले आहे.पण राज्यात ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणूनच ओळखले जातात.
मागच्या वेळेसच्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रेय भारणे यांना अजित पवार यांनी ताकद दिली होती.अजित पवारांनी ताकद दिल्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून दत्तात्रय भारणे यांचा विजय झाला होता.लागोपाठ त्यांना राज्यमंत्रिपदाची पण संधी मिळाली.लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागल्यामुळे पार्थ पवार यांनी पण जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.