मुंबई : नितेश राणे यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या इनोवा कार आणि इतर बारा बोलेरो गाड्यांसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, अजूनपर्यंत सदर वाहनांची रक्कम बँकेकडे जमा झालेली नाही. त्यामुळे नितेश राणे आणि संबंधित जामीनदारांना जिल्हा बँकेकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर गौप्यस्फोट केला आहे.
कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने संबंधित वाहन मालक आणि जामीनदार यांना वारंवार नोटीसा पाठवूनही थकबाकीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही काळ उलटल्यानंतर जिल्हा बँकेने संबंधित वाहन मालक आणि जामीनदारांना १०१ ची नोटीस पाठवून गाड्या जप्तीचे आदेश दिले आहेत, असे आ.नाईक म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारं मोठं विधान केलं आहे. ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.