IMPIMP
Nilesh Lanka took the oath of parliament in English and broke down after taking the oath of office. Nilesh Lanka took the oath of parliament in English and broke down after taking the oath of office.

“निलेश लंकेंनी संसदेत फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ”, विखे पाटलांना डिवचलं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील दक्षिण नगर चांगलाच चर्चेत आली होती. याठिकाणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून डिवचलं होतं. त्यानंतर संपुर्ण प्रचारादरम्यान लंकेंनी याचा आधार घेत सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला होता. यातच आता संसदेत निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेऊन दिलेलं चॅलेंज पुर्ण करून दाखवलं आहे.

हेही वाचा..“तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असेल”, हाकेंचं उपोषण स्थगित पण जरांगेंनी दिला इशारा 

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली. तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे सुजय विखे पाटलांनी म्हटले होते. यानंतर सुजय विखे पाटलांवर राजकीय वर्तुळातून जोरदार टिका झाली. यानंतर निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचं आव्हान स्विकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिले होते. मात्र आता संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे पाटील यांना एकप्रकारे उत्तर दिले आहे.

हेही वाचा..“महायुतीतील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर”, शरद पवार गटाने डिवचलं 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारमधील खासदारांचा संसदेत सध्या शपथविधी होत आहे. काल संपुर्ण मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर आज उर्वरित खासदार शपथ घेत आहेत. यातच आज महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीत तर काही हिंदीत तर काहींनी इंग्रजीमधून खासदारकीची शपथ घेतली.

READ ALSO :

हेही वाचा..भाजपला सर्वात मोठा धक्का, जनसंघापासून काम करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश 

हेही वाचा..“आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो, आता आरक्षण सोडतोय”, या गटाने आरक्षणाचा लाभ सोडला ? 

हेही वाचा..विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर, ‘या’ पक्षातील आमदारांची मुदत संपली 

हेही वाचा..विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनी कसली कंबर, गुपचूप बैठका अन् दिल्लीत बरच काही 

हेही वाचा..विधानसभेपुर्वी भाजपला गळती सुरू, माजी केंद्रीय मंत्र्यांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी 

Leave a Reply