राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन पाहणी दौरा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून सोशल मीडियावर एक लक्षवेधी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये साताऱ्यातील भर पावसात झालेल्या त्या सभेचे काही क्षण पाहायला मिळत आहेत.
‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली. दिल्ली मात्र थिजली’, असं लिहित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीकेबाजी केली आहे.
“सगळे पैलवान उभ्याने लोळवले तरी 288 पैकी 54 आले… आणि 54 पैकी अनेक आमदार स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आले पक्षामुळे नाही.”अशी खोचक टीका निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या या व्हिडिओवर केली आहे.
सगळे पैलवान उभ्याने लोळवले तरी 288 पैकी 54 आले… आणि 54 पैकी अनेक आमदार स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आले पक्षामुळे नाही. ZEE २४ तास चे नाव बदलून NCP २४ तास करून टाका. https://t.co/gP3ZhUtfl4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 18, 2020
Read also :
'हे' एकमेव काम पवार यांना उरले आहे,बारामती करांची भेट घेत विरोधी पक्षनेत्यांचा हल्लाबोल https://t.co/IoiaQxvdrp#SharadPawar #NCP #DevendraFadanvis #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020