भाजपचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर ”डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूँ” असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे
.
डरने वाले बाप का,
डरा हुआ बेटा हूं !!
-Baby Penguin— nitesh rane (@NiteshNRane) August 27, 2020
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपणे ठाकरे पिता- पुत्रांना टोला लगावला आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.