काल सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयला सोपवण्याची आदेश न्ययालयाने मुंबई पोलिसांना दिले. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून बिहार पोलिसांच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले आहेत. मात्र न्यायालयाचा निकाल येताच राजकीय वर्तुळातून याबाबत भाष्य करायला सुरुवात झाली होती.
पुढच्या काही दिवसात सामनाच्या अग्रलेखांचे विषय काय असतील याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे भाष्य केले आहे. यामध्ये मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस असे विषय असतील असे नितेश राणे म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे नाईट लाईफ करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा दिनो, जॅकलिन, दिशा पाहिजे असतात.. आणि वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस असा टोला देखील यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर वारंवार न निशाणा साधत आहेत. सुशांत सिंह प्रकरणामध्ये देखील नितेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार भाष्य करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेख चे विषय :
1.) मराठी अस्मिता
2.) महाराष्ट्र धर्म
3.) मराठी माणूसNight life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino,Jacqueline,disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस !
— nitesh rane (@NiteshNRane) August 20, 2020