मुंबई : आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरू आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर व्यक्त केला.
“अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ”; भाजपचा शिवसेनेला इशारा
उस्मानाबाद येथून काही कार्यकर्ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलासने काय पराक्रम केलं सर्वांना माहित आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तु्म्ही देखील पाहिलं आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत. तिथे शिवसैनिक घट्ट राहणारचं असंही ठाकरे म्हणाले.
“शाळेमध्ये जिला आम्ही पाहिलं नाही, त्या शारदा मातेचा फोटो लावला जातोय”; छगन भुजबळ
ज्यांना तुम्ही खच्ता खाऊन मोठे केले. ते खोक्यात गेले असा हल्लाबोल देखील त्यांनी शिंदे गटावर केला. तसेच कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही असा इशारा त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांना दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे.
आता किरीट सोमय्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार? शिवसेनेचा सवाल
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेनेच्या पाच याचिकांवर पाच घटनापीठांवर समोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची ? आणि धनुष्यबाण नेमकं कुणाला मिळणार त्यावर आज सुुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या जनतेचं लक्ष सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागून राहिलं आहे.
Read also
- “मंत्रालयातून संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- माझा आई भवानीवर अन् न्यायालयावर विश्वास, लढाई आम्हीच जिंकू..! उद्धव ठाकरे
- राऊतांना दिलासा नाहीच..! दसरा मेळाव्याचं भाषण ही तुरूंगातून पाहणार?
- “शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार?” सुप्रीम कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची मस्ती वाढलीय..! जयंत पाटील यांची सडकून टीका