IMPIMP
Not a single MLA feels that Gopichand Padalkar should leave the BJP and go elsewhere Not a single MLA feels that Gopichand Padalkar should leave the BJP and go elsewhere

“एकाही आमदाराची भावना नाही की, भाजप सोडून दुसरीकडे जावे”

मुंबई : बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील काही शिवसेनेच्या नेत्यांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चेहरा पडला होता. तुम्ही सत्ता असेल तरच तुम्ही काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार सत्तेत राहिले म्हणून त्यांनी काम केलं असंही ते म्हणाले.

“मावळत्या सरकारची जबाबदारी नाही तर उगवत्या सूर्याची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय” 

आमचे सरकार नव्हते. म्हणून आम्ही त्यावेळी गप्प बसून राहिलो नाही. पोलिसांची भिती दाखविली म्हणून आम्ही घरी बसलो नाही. माझ्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होणार होता. एक अपघात झाला म्हणून पोलीस अटक करायला निघाले होते. सदाभाऊ खोत यांच्या मुलावर खटले चालवले. गावात लोकांना तडीपार केले जात होते. म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही रोज लोकांच्या प्रश्नावर लढत राहिलो, असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले.

“तर शिंदे सरकारची ही पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना आवडली असती का?”

लोकांसाठी आमची तुरूंगात देखील जाण्याची तयारी आहे. भाजपचे महाराष्ट्रात 106 आमदार निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेहमी आक्रमक राहिला आहे. यापुढेही करीत राहिल. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकाही आमदाराची भावना झाली नाही की, भाजप सोडून जावे, ते म्हणत होते. 15 आमदार आमच्या संपर्कात, तीस आमदार संपर्कात असे ते सांगत होते. मात्र काहीच घडले नाही. असं देखील ते म्हणाले.

“राज्यात एक दुजे के लिए सिनेमा सुरु, सिनेमाचा अंत ही तसाच होईल” 

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर कडाडून टिका करीत आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं.

Read also