मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या बंडाळीनंतर यंदा दोन मेळावे पार पडले. बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घेतला तर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारचा खोक्यांचा सरकार म्हणून उल्लेख केला.
सुषमा अंधारेंनी शिवतीर्थ गाजवलं..! नारायण राणे, फडणवीसांना धो धो धुतलं
शिवसेनेविरोधात बंडकेल्यानंतर उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांचा गद्दार तसेच 50 खोक्के म्हणून उल्लेख करीत आहेत. यातच दसरा मेळाव्यात देखील एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खोक्यांचा खोकासूर म्हणून केला. यातच शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी 50 खोके असा उल्लेख असलेला खोकासुर यांचं दहण करण्यात आले.
“आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावलीय, पण त्यांच्या मुलाने काय केले?”; शरद पोंक्षे
शिवसैनिकांनी खोक्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला होता. त्यावर 50 खोक्यांचा खोकासुर असा उल्लेख होता. उद्धव ठाकरे यांचा भाषण संपल्यानंतर त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पंरपरेनुसार दसरा मेळाव्यानंतर रावण दहन झाले. पण यावेळचा रावण वेगळा होता. जसा काळ बदलतो तसा रावण ही बदललेला आहे. दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुर आहे. धोकासुर आहे. असं शिवसेनेकडून म्हटलं आहे.
Read also
- “तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला
- “….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
- एसटीच्या बुकिंगकरिता 10 कोटीची कॅश कशी घेतली.? कोणी दिली? याची इडी चौकशी करणार का?
- “शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपने लिहून दिलेली रटाळ बोअर क्रिप्ट”
- “सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले का ?” मनसेचा ठाकरेंना खोचक सवाल