दिग्गज भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होत्या. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील धोनीचा एक खास फोटो शेअर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस.तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.@msdhoni #Dhoni pic.twitter.com/dlt2OP7xEx
— Supriya Sule (@supriya_sule) August 15, 2020
सुप्रिया सुळेंनी धोनीला शुभेच्छा देत ट्विट केले की, भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस.तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
यासोबतच सुप्रिया सुळेंनी धोनीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ट्रॉफी पकडल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2007 चा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा असून, वानखेडे स्टेडियमध्ये सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. त्यावेळी शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. या खास फोटोवरून चर्चा रंगली आहे.