IMPIMP
Now I am in no hurry to join BJP, Khadse switched sides after the result Now I am in no hurry to join BJP, Khadse switched sides after the result

“भाजपमध्ये जाण्याची आता मला घाई नाही”, निकालानंतर एकनाथ खडसेंनी बाजू पलटली

जळगाव : लोकसभेच्या निकालानंतर राज्यात आता महाविकास आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याची आथा कोणतीही घाई नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट 

एकनाथ खडसे यांनी निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं सांगत राहिले. परंतु त्यांच्या प्रवेशावर भाजपच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला. याठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यात. परंतु राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर मला आता भाजपमध्ये जाण्याची घाई नाही. असं खडसेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार 

दरम्यान, यावेळी खडसे म्हणाले की, मागच्या निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले होते. परंतु यावेळेस त्यांना कमी मतदान झालं आहे. त्याचा फटका राज्यात महायुतीला बसलाच. परंतु केंद्रात देखील नरेंद्र मोदी यांना बसला आहे. आता मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालाय. यातच अलिकडच्या काळातील राज्यातील राजकीय वातावरण पाहिलं तर ते लोकांना आवडलेलं दिसून आलं. असेही खडसे म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा आम्ही जिंकल्या आहेत. माझ्या पक्ष प्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. यातच याठिकाणी आधीच भाजपची ताकद होती. त्यानंतर आमची देखील याठिकाणी ताकद झाली.

READ ALSO :

हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी 

हेही वाचा..“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव” 

हेही वाचा..कॉंग्रेसला मिळाल्या सर्वाधिक १३ जागा, नागपुरात लागले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर 

हेही वाचा..तर नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत

हेही वाचा..“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण