पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेतला. मात्र, या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर ५० अशा एकूण ५५ जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर, पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.. असे म्हणत पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच, पाहणी दौऱ्यावेळी अनेक नेत्यांनी जिल्ह्यात दौरे केले, त्यांच्यावर कुठलिही कारवाई नसल्याचे सूचवत, आपण परवानगी घेऊन मेळाव्याला गेल्यावरही गुन्हा दाखल केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020