IMPIMP
bacchu kadu bacchu kadu

आता बच्चू कडूंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर, यवतमाळमध्ये एकच चर्चा

यवतमाळ : राज्यात मागील काही वर्षात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी तर अनेकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील अशा पद्धतीने बॅनर लागले आहेत. यातच आता दोन आमदार असलेल्या प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने याची अधिक चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

माजी राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजी बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यातच बच्चू कडू यांच्या फोटोच्या पाठीमागे विधान भवन आणि लाल दिव्याच्या गाडीचाही फोटो लावण्यात आला आहे. सध्या यवतमाळ मधील उमरखेडा येथे झळकण्यात आलेल्या या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुतीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, अशा अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. अशातच आता काही महिन्यांवर विधानसभेची निवडणुक येत आहे. त्यात आता कोण बाजी मारणार ? अन् कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाचा माळ पडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“घेणं न देणं फक्त क्रेडीट घेण्याची घाई..!” राज्य सरकारच्या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवरून भारतीय क्रिकेट संघ गायब 

हेही वाचा..जरांगे पाटलांच्या सुरक्षितेचा मुद्दा विधानसभेत, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली महत्वाची माहिती 

हेही वाचा…“वर्ल्ड कप जसा मोदींनीच जिंकलाय, असा त्यांचा वावर”, विरोधकांची मोदींवर जहरी टिका 

हेही वाचा…कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

Leave a Reply