मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या नेटकऱ्यांच्या निशान्यावरती आहेत. एका मुलाखतीच्या व्हिडीओवर एका युजर्सने लसीचे कंत्राट कुणाला दिलं? असा सवाल केला तर पेडणेकर यांनी ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिल. या उत्तरावरून त्या टीकेच्या धनी झाल्या. सर्व नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं.
त्यावर ‘हे ट्विट मी केलेच नाही’, असं पेडणेकर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावर आता मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावलाय. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे म्हणा ना.. माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट करुन देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावला आहे.
महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर
यापुढे
माझा मोबाईल माझी जबाबदारी— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 3, 2021