IMPIMP
Opposition lashed out at Tanaji Sawant for not giving shelter to the crabs of corruption Opposition lashed out at Tanaji Sawant for not giving shelter to the crabs of corruption

“भ्रष्टाचाराच्या खेकड्यांना अभय न देता त्यांच्या नांग्या ठेचा”, तानाजी सावंतांवर विरोधकांची गरळ

पुणे : महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरण आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना तसेच मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिवांना एक धक्कादायक पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात प्रश्न केला असता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पळ काढल्याचा दिसून येत आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

हेही वाचा..“मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन”, अटक केलेल्या ससूनच्या डॉ. तावरेचा गर्भित इशारा

डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आल्यानंतर पत्रकारांनी तानाजी सावंत यांना याबाबत प्रश्न विचारला. पंरतु त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता सावंतांनी पळ काढला. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टिका केली आहे. रोहित पवारांनी यासंदर्भात एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

हेही वाचा..पुणे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाच्या आमदाराचं नाव समोर, आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत 

त्यात एकीकडं घोटाळे करायचे आणि आरोप झाल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढायचा. या आरोग्यमंत्र्यांच्या वर्तनावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरूनच ते सिद्ध करतायत की, ते भ्रष्टाचाराला कवटाळून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्टाचाराच्या खेकड्यांवर कारवाई करणार की नाही ? असा सवाल रोहित पवारांनी केला.

तसेच राज्याची तिजोरी सांभाळण्याची जबाबदारी अजितदादांवर आहे. त्यांना माझी विनंती आहे की आरोग्य व्यवस्था पोखरणाऱ्या अशा भ्रष्टाचाराच्या खेकड्यांना अभय न देता त्यांच्या नांग्या ठेचा. अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी 

हेही वाचा…“आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही, विधान परिषदनिवडणुक लढणार “, मनसेने महायुतीला दिला कडक इशारा

हेही वाचा…गोलमाल है भाईस सब गोलमाल है..! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्षा