IMPIMP
otherwise-narendra-modis-power-will-go-nitish-kumar-and-chandrababu-naidu-as-king-makers-in-establishing-power otherwise-narendra-modis-power-will-go-nitish-kumar-and-chandrababu-naidu-as-king-makers-in-establishing-power

तर नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. मात्र मित्र पक्षांच्या मदतीमुळे भाजप एनडीए सरकारला बहुमत मिळालेलं आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीला देखील मोठ्या जागा मिळाल्या आहेत. मात्र यामध्ये आता एनडीए आघाडीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रपद्रेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. यातच आता सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा…इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा 

भाजपप्रणित एनडीए सरकारला ५४३ पैकी २९४ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असं चित्र निर्माण झालंय. मात्र बिहारचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे प्रत्येकी म्हणजे जेडीयुचे १२ तर टीडीपीचे १६ खासदार निवडून आले आहेत. जर या दोघांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपकडे फक्त २६६ खासदार शिल्लक राहतात. त्यामुळे ते बहुमताच्या आकड्यांपासून खुपच लांब आहेत.

हेही वाचा..पुणे कार अपघाताची पुनरावृत्ती, शिरूरमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एकाला चिरडलं 

तर दुसऱ्या बाजूला जेडीयु आणि टिडीपी इंडिया आघाडीत आले तर इंडिया आघाडीच्या २६९ जागा होतात. त्यानंतर काही अपक्षांच्या जोरावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आता नितिश कुमार इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार आहेत. यातच बिहारचे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार सोबतच दिल्लीला रवाना झाले आहेत.

तर चंद्राबाबु नायडू यांच्याशी इंडिया आघाडीचे नेते संपर्क ठेवत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीत सध्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या १० जून रोजी पंतप्रधान पदाची कोण शपथ घेणार ? आणि कुणाचं सरकार स्थापन होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण 

हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट 

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार 

हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला सर्वात जास्त जागा, अजित पवार गटाला भोपळा ? एक्झिट पोल समोर 

हेही वाचा..पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर