भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा काल मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसाद लाड यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे येण्यासाठी लाड नगरच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांचा अपघात झाला.
अपघात झाला हि बातमी जरी खरी असली तरी, श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने मी सुखरूप आहे , आपण सर्वजण काळजी करू नका !
आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे !!!
– आ प्रसाद लाड@BJP4Maharashtra @bjp4mumbai @BJP4India pic.twitter.com/DTpJHMSbHr
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 14, 2020
ट्विटवर व्हिडीओ शेअर करत लाड यांनी माहिती दिली की, पघात झाल्याची बातमी खरी असली तरी गणपती बाप्पाच्या कृपेने मी, माझ्यासोबतचे पोलीस अधिकारी, माझे स्वीय सहाय्यक, गाडी ड्रायव्हर आम्ही सगळे सुखरुप आहोत. काहीही झालेले नाही. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अपघात होऊनही आम्हाला साधे खरचटलेही नाही.