मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंचा पराभव केला आहे. समाधान आवताडे यांचा या निवडणुकीत जवळपास 4 हजार मतांनी विजय झाला. सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली पाहायला मिळाले होते. आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. आता अखेर भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील विजयांमुळे भाजप नेत्यांचे आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळत असून, नितेश राणे यांनी या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुली ऑफरच दिली आहे.
पंढरपुर पोट निवडणुकीमधे MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले..
तरीही लोकानी नाकारले..
MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे..
येणारा धोका समजा आणि..
एक पाउल पुढे टाका..
भा ज प हा एकच पर्याय आहे..
महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2021
पंढरपूर पोटनिवडणुकीमधे महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
महाविकास आघाडी मधल्या आमदारांना हा संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे, असे ट्विट करत नितेश राणे यांनी आघाडीच्या आमदारांना भाजपात येण्याची खुली ऑफरच दिली आहे. नितेश राणेंनी अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या आमदार खुले आमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.