IMPIMP
Khed Alandi VidhanSabha Election Khed Alandi VidhanSabha Election

इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. यातच महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत अटळ असतांना आता इच्छूक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच लोकांना विविध आमिष दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु ते आमिष लोकांच्या जीवाशी येऊ शकतात. अशीच एक घटना घडली आहे. मोफत पंढरपुर यात्रा करून परतलेल्या खेड तालुक्यातत अपघात होऊन २१ जण जखमी झाले आहेत. खेड तालुक्यात विधानसभा निवणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवाराच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

पंढरपुर दर्शन करून यात्रेकरूंना सुखरूप परत घरी सोडण्यासाठी बस आली होती. त्यावेळी तांबडे वाडी परिसरात पाऊस पडत होता. आढे ता खेड गावा जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्यात चाक उतरल्याने बस उलटली. त्यातील वीस पंचवीस भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळले.

खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छूकांकडून विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून एक भाग आषाढी वारू सुरू असताना पंढरपुर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छूक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. परंतु दर्शन घेऊन परतत असतांना सोमवारी खेड तालुक्याच्या आढे गावाजवळ पहाटे अपघात झाल्याने २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

मयुर दौंडकर यांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आषाढी वारीनिमित्ताने  आप ली वारी आपल्या दारी या माध्यमाच्याद्वारे लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या घरापर्यंत जाऊन मयुर दौंडकर सध्या संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही इच्छूक उमेदवारांकडून पंढरपुर वाऱ्यासारख्या देवदर्शन घडवून आणत आहेत. त्यामुळे सध्या याची चर्चा अधिक सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

Leave a Reply