संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हुआ हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Pankaj Singh (@PankajSinghBJP) September 1, 2020
“कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी करुन घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला आयसोलेट करा आणि स्वतःची चाचणी करा” असे आवाहन पंकज सिंह यांनी ट्विट करत केले आहे. पंकज सिंह हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र. पंकज हे उत्तर प्रदेशातील नोएडा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे यूपी भाजपच्या उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे.
दरम्यान, पंकज सिंह यांच्या आधी योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मोहसीन रझा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मोहसीन रझा यांनी सोमवारी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन रझा यांनी केले.