IMPIMP
Pankaja Munde or Bajrang Sonawane? Who will bet in Beed? Exit poll came in front Pankaja Munde or Bajrang Sonawane? Who will bet in Beed? Exit poll came in front

पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर

पुणे : देशात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी मतदान पार पाडलं आहे. आता येत्या ०४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लोकसभेची निवडणुक पार पाडली. यातच राज्यातील काही मतदारसंघात हाय प्रोफाईल लढती झाल्यात. यातच आता एक्झिट पोल समोर यायला समोर सुरूवात झाली आहे.

हेही वाचा…जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ? 

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली. बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. तर पंकजा मुंडे यांच्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले होते. यातच टिव्ही९ च्या नुसार एक्झिट पोलनुसार बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचं सांगण्यात आले आहेत. त्यामुळे बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा…“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप 

दरम्यान, लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये जातीय समीकरण महत्वाची मानली गेली. यावरून जातीवरून अनेक घटना घडल्या. तर मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे कि बजरंग सोनवणे कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा 

हेही वाचा..पुणे कार अपघाताची पुनरावृत्ती, शिरूरमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एकाला चिरडलं 

हेही वाचा…२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किती जागा येतील? Exit Poll च्या आधी प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी 

हेही वाचा..जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्याल का ? नाना पटोलेंनी दिलं हे उत्तर 

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा, तर मराठवाड्यात गुरांना कोरडा चारही नाही”