IMPIMP
Pankaja munde Pankaja munde

पंकजा मुंडेंचं भाजपकडून अखेर झालं राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेवर मिळाली संधी

बीड : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांची चर्चा झाली. राज्यात सत्ता बदल होण्याच्या आधी विधान परिषदेसाठी निवडणुका झाल्यात. त्यातही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. त्यानंतर मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागेल असं म्हटलं जात होतं. परंतु त्याठिकाणीही मुंडेंना संधी नाकारण्यात आली. यानंतर राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षण तापलं. त्यानंतर मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा त्याठिकाणी मोठा पराभव झाला. यातच आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

येत्या १२ जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक होत आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. या पाच जागांसाठी भाजपने आता आपली यादी जाहीर केली असून यात पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. मुंडेंसह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे.

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यामागे जातीय समीकरण असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका भाजपला बसला. यातच आता काही महिन्यात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे ओबीसी मतं आपल्याकडे यावीत, यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळायला हवी असे वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका. भुतदया दाखवू नका. तो आमचा हक्क आहे. इथळ्या तरूणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा -जसा बाहेर येईल. एकत्र येईल. तसा-तसा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल. असेही हाके यांनी म्हटलं होतं.

READ ALSO :

हेही वाचा…“विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर..! ‘या’ पाच जणांना मिळाली भाजपकडून संधी 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

Leave a Reply