IMPIMP
pankaja munde pankaja munde

विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…”पाच वर्षे अविरत सेवा सुरु ठेवल्यानं..,”

बीड :  येत्या १२ जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक होत आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. या पाच जागांसाठी भाजपने आता आपली यादी जाहीर केली असून यात पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. मुंडेंसह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे. त्यानंतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येते. घटनात्मक पदावर असल्यास जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं. जनतेला न्याय देताना पक्षाची शक्ती बळकट करण्यासाठी योगदान देणं आमचं कर्तव्य आहे. मला दिलेल्या संधीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कोअर कमिटीचे सगळे सदस्य, प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांचे आभार मानते. असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, “विधानसभेत झालेल्या पराभवानंतरही पाच वर्षे लोकांची सेवा अविरतपणे सुरु ठेवली. त्यामुळे लोकसभेला संधी मिळाली. पण थोड्या मतांनी पराभव झाला. आता पक्षानं मला विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाची आभारी आहे. पाच वर्षे अविरत सेवा सुरु ठेवल्यानं इथं पोहोचू शकले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांची चर्चा झाली. राज्यात सत्ता बदल होण्याच्या आधी विधान परिषदेसाठी निवडणुका झाल्यात. त्यातही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. त्यानंतर मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागेल असं म्हटलं जात होतं. परंतु त्याठिकाणीही मुंडेंना संधी नाकारण्यात आली. यानंतर राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षण तापलं. त्यानंतर मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा त्याठिकाणी मोठा पराभव झाला. यातच आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

Leave a Reply