IMPIMP

परभणीत ठाकरेंचा शिलेदार आघाडीवर, महादेव जानकरांना मोठा धक्का

पुणे : परभणी लोकसभा मतदार संघातून पहिल्या फेरी संजय जाधव आघाडी घेतली असून त्यांना आतापर्यंत २०,७८६ मतं पडली आहेत तर महादेव जानकर यांना १७,६१२ मत मिळाली असून संजय जाधव यांनी ३०७४ मतांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला हिंगोली लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर पहिल्या फेरीला 2500 मताने आघाडीवर आहेत.

मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात मोठी चुरस बघायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीअखेर बारणे यांना ३६ हजार ५४७ तर वाघेरे यांना ३४ हजार ६५७ मते मिळाली आहे. त्यामुळे बारणे यांनी १ हजार ८९० मतांची आघाडी घेतली आहे. तर बारामती मध्ये
सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्या फेरीत ११५३२ मतांनी आघाडी घेतली आहे.

तर अटीतटीच्या झालेल्या शिरूरच्या लढतीत सुरूवातीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. चौथी फेरीअखेर खासदार अमोल कोल्हे 21400 मतांनी आघाडी घेतली आहे.

तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अंती कॉग्रेस उमेदवार अँड गोवाल पाडवी यांनी 64000 मतांनी आघाडी घेतली असून
भाजपाच्या डॉ हिना गावित पिघाडीवर गेल्या आहेत.