IMPIMP
Patel's explanation on Raut's allegation why should I pay for the meal at someone else's house? Patel's explanation on Raut's allegation why should I pay for the meal at someone else's house?

“दुसऱ्याच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? राऊतांच्या आरोपावर पाटलांचे स्पष्टीकरण

कोल्हापुर : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घरातील जेवणाचा खर्च दुसऱ्याकडुन घेतल्याचा आरोप जाहीर मेळाव्यात केला होता. त्यावर राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, ज्या सतेज पाटलांकडून या जेवणाचे पैसे घेतले असा उल्लेख राऊत यांनी केला, त्याच सतेज पाटलांना याबद्दल विचार असं म्हणाले. यावर आता, राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? असं सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

“हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेत ना, मग तुम्हाला मंत्रिपद कशासाठी हवंय?”

विनायक राऊत यांनी टीका केल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि राऊत यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. याबाबत पुढच्या वेळी निवडून येऊन दाखवा. त्याचबरोबर जेवणाचे पैसे घेतले होते का? हे बंटी पाटील यांनी सांगवं असं सांगत राऊतांसारखे नेते नेतृत्वाला डॅमेज करत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी राऊत यांच्यावर केला आहे.

“मावळत्या सरकारची जबाबदारी नाही तर उगवत्या सूर्याची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय” 

याआधी राऊत म्हणाले होते की, कोल्हापूरच्या निवडणुकीत बेईमानीची कीड मी सुद्धा अनुभवली आहे. घरी जेवायला बोलवून खर्च दुसऱ्याकडून वसूल करायचा ही क्षीरसागर यांची वृत्ती आहे. असं म्हणत आज माईक ओडत आहेत, उदया पॅन्ट ओडून नागड करतील. बंडखोर आमदारांचे राजकीय आयुष्य संपले आहे. जाताना शिवसेना सोडली म्हणुन सांगुन जावा. कामाख्या देवीच्या पुजाऱ्याने काल निरोप पाठवला आहे. तुमच भविष्य उज्वल आहे. देवीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे.

Read also