मुंबई : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी १० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.
त्यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. एकनाथ गायकवाड हे काँग्रेसकडून दोनवेळा संसदेवर निवडून गेले होते.
१४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे खासदार होते. गायकवाड यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पराभूत केले होते. गायकवाड हे धारावी मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेले होते. तर दोनवेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते.
Congress Party's senior leader, Ex-MP, Ex-Minister Eknath Gaikwad Ji passed away today.
My deepest condolences to his daughter and Education Minister of Maharashtra @VarshaEGaikwad, Gaikwad family and his friends/supporters. pic.twitter.com/FSBtScFAFX— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 28, 2021