IMPIMP

“पक्ष फुट सत्ताबदल लोकांना आवडलं नाही”, एक्झिट पोलमध्ये शिंदे अन् अजित दादांना मोठा दणका

मुंबई : राज्यात झालेली पक्ष फुट आणि आणि राजकीय बदल लोकांना आवडलेलं दिसून येत नाही. कारण अने पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलमध्ये जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यात १३ लोकसभा मतदारसंघात लढत झाली. यातील तब्बल दहा मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर आहेत तर फक्त तीन जागेवर शिंदेंचे उमेदवार जिंकतील असा दावा सांगण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी एकूण दहा जागा लढवल्या होत्या. त्यातील सहा जागेवर आपले उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. तर काही ठिकाणी थोड्या फरकावर आहेत. मात्र यामध्ये अजित पवार यांनी चार जागा लढवल्या होत्या. त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात एकूण लोकसभेच्या एकूण 48 जागापैकी महायुतीला 22, महाआघाडीला 25 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराला मिळणार असल्याचा एक्झिट पोलमध्ये दिसून आलं आहे. यामध्ये भाजपाला 18, शिंदेच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील. तर अजित पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. या एक्झिट पोलमुळे आतापासून राज्याचं राजकीय गणित विस्कटल्याचं दिसत आहे. मात्र हा फक्त अंदाज असून खरं काय ते 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

 

इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स

महायुती – ३४

मविआ – १३

अपक्ष – १

 

न्यूज २४ चाणक्य

महायुती – ३३

मविआ – १५

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ

महायुती – ३० ते ३५

मविआ – १३ ते १९

 

रिपब्लिक PMARQ

महायुती – २९

मविआ – १९

 

टीव्ही ९ पोलस्ट्राट

महायुती – २२

मविआ – २६

 

एबीपी-सी व्होटर

महायुती – २४

मविआ – २३