नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळच्या राजौरी जिल्ह्यात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यंदाही पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा पंतप्रधान जैसलमेरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करू शकतात. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील असण्याची शक्यता आहे.
This Diwali, let us also light a Diya as a #Salute2Soldiers who fearlessly protect our nation. Words can’t do justice to the sense of gratitude we have for our soldiers for their exemplary courage. We are also grateful to the families of those on the borders. pic.twitter.com/UAKqPLvKR8
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2020
आज दिवाळीच्या निमित्ताने मोदींनी ट्विट करत सीमेवरील जवानांसाठी एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, दिवाळीत आपण सीमेवरील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावायला हवा. आपल्या सैनिकांच्या महान पराक्रमासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आम्ही सीमेवरील सैनिकांच्या कुटुंबियांचे खूप आभारी आहोत.
दरम्यान, पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भारत-चीनमध्ये सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशात मोदींच्या जैसलमेर दौऱ्यामुळे जवानांचा उत्साह नक्कीच वाढेल.