पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निसर्गावरचे प्रेम सोशल मीडिया पोस्टद्वारे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाउंटवर एक नवीन कविता पोस्ट करण्यात आली आहे. या कवितेबरोबरच एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी मोर सोबत दिसत आहेत. यात मोदी मॉर्निंग वॉक नंतर मोरांना दाणे टाकताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी नियमित सकाळी वॉकला गेल्यानंतर मोरांना दाणे टाकत असतात. पंतप्रधान मोदींच्या दिनचर्यामध्ये याचा समावेश आहे, ज्यांचे फोटो समोर आले आहेत. लॉकडाऊन काळात विरंगुळ्यासाठी प्रत्येकजण काही ना काही डिजिटल उपक्रम राबवत आहे. घरात राहूनच वेळ व्यतीत केला जात आहे. अनेकांनी विविध उपक्रम किंवा ऑनलाईन प्रशिक्षण या काळात शिकून घेतले आहे. पंतप्रधान मोदी हेही नेहमी स्वत:ला कामात व्यस्त ठेवत असतात. मात्र, कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे त्यांना थोडासा आराम मिळाला आहे. याही काळात ते पशू-पक्षांसमवेत आपला वेळ घालवत आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोरांसमवेतचा व्हिडिओ शेअर कला आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर मोदींसमवेत खेळताना, रमताना या व्हिडिओत दिसत आहे.
भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज। pic.twitter.com/Dm0Ie9bMvF— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2020
पंतप्रधान मोदींना बाग बगिचा, प्राणी पक्षी यांची मोठी आवड आहे. यापूर्वीही ते आपल्या पंतप्रधान निवास स्थानातील गार्डनमध्ये योगा करताना दिसून आले होते. आता, मोरसमवेत मोदींचा हा व्हिडिओ त्यांचे पक्षीप्रेम दाखवून देतो. मोदींनी ट्विटर, इंस्टा आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तर, कवि आणि आम आदमी पक्षाचे जुने सहकारी डॉ. कुमार विश्वास यांनी या व्हिडिओच्या माध्यमातूनही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.