पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील बिहारमध्ये आमने सामने असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये 3 सभा घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोबत JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार असतील. तर राहुल गांधी आज बिहारमध्ये दोन रॅली करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत RJD नेते तेजस्वी यादव हे असतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रॅली आणि सभा दरम्यान काही नियमावली जारी करण्यात आली आहे. भाजपने आपल्या जाहिरनाम्यात सत्ता आल्यास, मोफत कोरोना लस देण्याचे आश्वसान दिले आहे. यावरून भाजपवर विरोधक जोरदार टीका करत आहे. यावर हे दोन्ही नेते आज काय बोलणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.