IMPIMP
Political rebellion again in the state before assembly elections, 6 MLAs of Shinde group in contact with Thackeray Political rebellion again in the state before assembly elections, 6 MLAs of Shinde group in contact with Thackeray

विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात पुन्हा राजकीय बंड, शिंदे गटाचे ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात ?

मुंबई : राज्यात मागच्या वर्षी सत्तांतरण झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गज ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर ठाकरेंचे अस्तित्वच धोक्यात आले असून फक्त त्या गटात दोनच माणसं शिल्लक राहणार अशी टिका केली जाऊ लागली. मात्र अशा परिस्थितीत ठाकरेंनी काही नव्या साथीदारांसह लोकसभेची निवडणुक लढवली आणि ९ खासदार निवडून आणलेत. तर शिंदे गटाला फक्त ७ जागा राखता आल्या. त्यानंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा..केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी गडकरींपेक्षा चांगला पर्याय नाही 

यातच आता लोकसभेच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध किंवा विरोधात कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ? 

आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशीही माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने देखील मोठे यश मिळवलं आहे. त्यामुळे अजित पवार गटातील देखील १२ ते १४ आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुर्वी पुन्हा राज्यात बंडांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले.. 

हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ 

हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद