IMPIMP
Praful Patel called Modi 'Jirtop', Sharad Pawar group's venomous criticism Praful Patel called Modi 'Jirtop', Sharad Pawar group's venomous criticism

प्रफुल्ल पटेलांना मोदींना घातला ‘जिरटोप’, शरद पवार गटाची जहरी टिका, म्हणाले.. “त्या बीभत्स माणसाच्या..”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर यज्ञ केला अन् गंगा आरती केली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्याचे मुख्यमंत्री देखील हजर होते. तर राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी हजेरी लावली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप डोक्यावर घातला. आता यावरून शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार टिका केलीय.

हेही वाचा..घसरलेल्या टक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील 

प्रफुल्ल पटेल यांच्यावर टिका प्रशांत जगताप करतांना म्हणाले की,  प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, “जिरेटोप” आहे. तो तुमच्या हातात. अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे ? अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे? असा खोचक सवाल देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा..“अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट, केंद्रात सत्ताबद्दल”, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा 

दरम्यान, निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून आता पाचव्या टप्प्यातील मतदारसंघासाठी प्रचार सुरू झाला आहे. पाचवा टप्प्यातील येत्या २० मे रोजी तर सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी मतदान होत आहे. तर सरतेशेवटी ०१ जूनला सातवा टप्पा पार पडणार आहे. तर ०४ जून रोजी संपुर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.

READ ALSO :

हेही वाचा….भाजपच्या आमदारांनी ठाकरेंना घेरलं, भुजबळांनी ठाकरेंची बाजू घेत चांगलचं सुनावलं 

हेही वाचा..निवडणुकीनंतरही युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय,अजितदादांच्या विरोधात विधानसभेची तयारी ? 

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा नाशकात ८०० कोटींचा घोटाळा, चौकशी करण्याची राऊतांची फडणवीसांकडे मागणी 

हेही वाचा..“त्यावेळी ठाकरेंना वाटतं होतं की सरकार मोडावं अन् भाजपसोबत जावं”, तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट 

हेही वाचा..घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा संबंध नाहक भाजपने ठाकरेंशी लावला, भाजपकडून किळसवाण राजकारण सुरू