नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Union Minister Prakash Javadekar tests positive for #COVID19. pic.twitter.com/i9cltg9VE9
— ANI (@ANI) April 16, 2021
जावडेकर यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच, गेल्या 2 ते 3 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन देखील जावडेकर यांनी केले आहे.
दरम्यान, याआधी राज्यातील अनेक भाजप नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भाजप आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करून त्यासंदर्भात माहिती दिली आहे.