मुंबई : कंगना राणावत ने मुंबईबाबत विधान केले आणि नेटकाऱ्यानी तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे कंगनाचे विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना जर मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तुझे धोबड फोडल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत कंगनाला जणू इशाराच दिला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबई ही पाकव्याप्त कश्मीर वाटायला लागली असल्याचे एका ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठायला सुरुवात झाली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील कंगनाला इशारा देत एक ट्विट केले होते.
काय म्हणालेत सरनाईक नेमकं आपल्या ट्विटमध्ये
कंगनाला खासदार खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली.
ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत.
उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.
कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 4, 2020