मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सध्या वादात सापडला आहे. यावरुन विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडीचे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना टोला लगावला.
कोरोनासारख्या संकटकाळात स्वत:चे बंगले सजविण्यात मश्गुल असणारे मंत्री सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
“कोरोनाच्या संकटकाळात सरकारी अधिकाऱ्यांनी बंगल्याची डागडुजी करणे योग्य नाही. राज्याचे मंत्री आपापल्या बंगल्यावर करोडोंचा खर्च करत आहेत व गाड्यांवर लाखोंचा खर्च करीत आहेत आणि आता महापालिकेचे आयुक्त आपल्या बंगल्यावर ५० लाखांचा खर्च करीत आहेत हे शोभनीय नाही.”, असे प्रवीण दरेकर म्हणाले