मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच सुशांतसिंह राजपूतच्या एम्सच्या अहवालावर अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका केली होती यानंतर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांवर टीका केली आहे.
अनिल देशमुखांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडेंनी कुठून उभं राहावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आणि अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, राज्यातला कोविडचा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळता आलेला नाही. तसेच कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, अशी टीका त्यांनी केली.
अजून न बाळंतीण झाली नाही आणि हे नाव ठेवून मोकळे, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सणसणीत टोला लगावला . एम्सचा बाबतीत जो रिपोर्ट येईल तो आम्ही स्वीकारणारच आहोत. आणि अद्याप सीबीआय रिपोर्ट जाहीर होणे बाकी आहे. पण गृहमंत्री अनिल देशमुखांना एवढी इतकी घाई का आहे? असा सवालही त्यांंनी निर्माण केला.
Read Also :
सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला संपत्तीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं?, शिवसेना नेताचा दावा https://t.co/CG1sbpnmfC @PratapSarnaik #SushantSinghRajputCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020