मुंबई : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
बीड जिह्यात दौरा करुन मुंबईला परतल्यानंतर प्रीतम मुंडेंना सर्दी, खोकला आणि ताप जाणवतोय. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल। pic.twitter.com/bQQ1Fbp7GE
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 24, 2021
प्रीतम मुंडेंनी सांगितले की, 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी RTPCR चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या उपचार घेत आहे.
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले.
ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या.
प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो. @DrPritamMunde— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 24, 2021
प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या.प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो, असे धनंजय मुंडे ट्विट करत म्हणाले.