IMPIMP

“राहुल गांधी भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील”

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. उत्तर प्रदेश सह हिमाचल प्रदेश आणि बिहार अशा काही राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान १ जुनला पार पडणार आहे. त्यानंतर ०४ जुनला याचा निकाल लागणार आहे. अशाच विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्या वर हल्ला बोल करत देशात इंडिया आघाडीची सत्ता स्थापन होईल असं भाकित केल जात आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे राहुल गांधींना स्वप्न पाहु द्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.

यातच फडणवीसांनी काल झालेल्या जितेंद्र आव्हाड प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. आजच नाही कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात.

ज्यांनी चर्चा सुरु केली. त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं? हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी (जितेंद्र आव्हाड) फाडला. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असा इशारा देखील त्यांनी दिला.