नवी दिल्ली : : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. पटेल यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
It is a sad day. Shri Ahmed Patel was a pillar of the Congress party. He lived and breathed Congress and stood with the party through its most difficult times. He was a tremendous asset.
We will miss him. My love and condolences to Faisal, Mumtaz & the family. pic.twitter.com/sZaOXOIMEX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2020
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुममताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’.