कोल्हापूर : केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांना सुरूंग लागला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौतसारख्या नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही,’ अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रानौतचा समाचार घेतला आहे.
शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेशसारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो ?, असा टोला शेट्टी यांनी लगावला. ‘कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडी म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सुचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील, तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील आणि हा दिवस फार लांब नाही,’ असा स्पष्ट इशारा शेट्टींनी दिला.
Read Also
…तर आज शरद पवार यांना उपवास करावा लागला नसताhttps://t.co/Pxe4F2EUVd#DevendraFadanvis #SharadPawar #KisanBill2020
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020