मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आलेले आहे. न्यायालयाकडून देखील त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, इतर क्षेत्रातील व्यक्ती देखील यावर मत व्यक्त करत आहे.
अर्णब यांच्या अटकेवरून दोन गट पडले असले तरी, काहीजणांना मात्र आनंद झाल्याचे दिसत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राम गोपाल वर्मा यांनी अर्णब यांच्या अटकेवर आनंदात ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
Am so thrilled about finally the Shivsena tiger Uddhav showing the mettle of his dad in putting the barking cat in a judicial cage
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 4, 2020
राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले की, ही कारवाई पाहून मला आनंद झाला. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली. एका किंचाळणाऱ्या बोक्याला त्यांनी पिंजऱ्यात टाकले. त्यांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.